शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
2
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
3
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
4
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
5
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
6
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
7
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
8
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
9
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
10
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
11
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
12
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
13
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
14
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
15
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
16
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
17
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
18
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
19
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
20
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार

मागासवर्गीय वस्त्यांमधील विकासकामांचा आराखडा तयार होणार कधी?

By संतोष येलकर | Published: July 17, 2023 4:32 PM

जिल्हा परिषद : येत्या पाच वर्षांतील प्रस्तावित कामांचा आराखडा रखडला

अकोला: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या ( मागासवर्गीय ) वस्त्यांचा विकास योजनेंतर्गत येत्या पाच वर्षांतील जिल्ह्यातील प्रस्तावित विकासकामांचा कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडून प्रस्तावित कामांचे प्रस्ताव मागविण्यात आले; मात्र तीन पंचायत समित्यांकडून अद्यापही प्रस्तावित कामांचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होणे अद्याप बाकी आहे.

त्यामुळे रखडलेला जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकासकामांचा आराखडा तयार होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये २०२३-२४ ते २०२७-२८ या पाच वर्षांच्या कालावधीत करावयाच्या विकासकामांचा कृती आराखडा तयार करून विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या पाच वर्षांतील मागासवर्गीय वस्त्यांमधील प्रस्तावित विकासकामांचा आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना प्रस्तावित विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना गेल्या दोन महिन्यांपूर्वी देण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी चार पंचायत समित्यांकडून प्रस्तावित कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले असले तरी उर्वरित तीन पंचायत समित्यांकडून अद्यापही प्रस्तावित विकासकामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील येत्या पाच वर्षांत करावयाच्या विकासकामांचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया रखडली आहे.

त्यानुषंगाने पंचायत समित्यांच्या प्रस्तावांअभावी रखडलेला जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील प्रस्तावित विकासकामांचा कृती आराखडा मार्गी लागणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

‘या’ पंचायत समितींचे रखडले प्रस्ताव !

जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील येत्या पाच वर्षांत करावयाच्या प्रस्तावित कामांचे प्रस्ताव जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर या चार पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला प्राप्त झाले; परंतु बाळापूर, बार्शीटाकळी व पातूर या तीन पंचायत समित्यांकडून परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होणे अद्याप बाकी असल्याचे चित्र आहे.मागासवर्गीय वस्त्यांमधील विकासकामांचा आराखडा तयार होणार कधी?