- संतोष येलकर
अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांना मदत वाटपासाठी ७ हजार १०३ कोटी ७९ लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी आहे. त्यापैकी शासनामार्फत आतापर्यंत दोन हप्त्यांमध्ये २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून, उपलब्ध मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, मागणीच्या तुलनेत आणखी ४ हजार १९४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मदत निधी शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा दुष्काळग्रस्त शेतकºयांकडून करण्यात येत आहे.शासनामार्फत दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील १५१ तालुक्यातील शेतीपिकांच्या नुकसान भपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी जिल्हानिहाय मागणीनुसार ७ हजार १०३ कोटी ७९ लाख रुपयांची मदत शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतीपिकांच्या नुकसानासाठी ६ हजार ३९७ कोटी ५९ लाख रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी ७०६ कोटी २० लाख रुपयांच्या मदत निधीचा समावेश आहे. मागणीनुसार देय असलेल्या मदत निधीपैकी २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांचा मदत निधी दोन हप्त्यांमध्ये वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय शासनामार्फत २५ जानेवारी रोजी घेण्यात आला. त्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी मदत वाटपाच्या पहिल्या व दुसºया हप्त्यापोटी शासनामार्फत २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांचा मदत निधी राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आला असून, विभागीय आयुक्त कार्यालयांमार्फत संबंधित जिल्हास्तरावर मदतनिधी वितरित करण्यात आला. दोन हप्त्यांमध्ये उपलब्ध मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, दुष्काळी मदत वाटपासाठी आवश्यक असलेला आणखी ४ हजार १९४ कोटी रुपयांचा मदत निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार, याबाबत दुष्काळग्रस्त शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.विभागनिहाय अशी आहे मंजूर मदतीची रक्कम!विभाग रक्कम (कोटीत)कोकण ३४.४९नाशिक २१८०.०१पुणे १००९.२८औरंगाबाद २५६४.९१अमरावती ११५८.११नागपूर १५६.९०.................................................एकूण ७१०३.७९