शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

सिटी बस थांबतील कोठे?

By admin | Published: January 26, 2017 10:09 AM

अकोला शहरातील बस थांब्यासाठी जागेचा सर्व्हेच नाही!

अकोला: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अकोलेकरांच्या सेवेत पाच शहर बसेस दाखल झाल्यानंतर ह्यआरटीओह्णकडून अद्यापही परमिट मिळाले नाही. शिवाय मनपाकडून बस थांब्यांसाठी जागेचा सर्व्हे न केल्यामुळे मुख्य रस्त्यांवरून धावणार्‍या सिटी बसेस प्रवाशांसाठी नेमक्या थांबतील कोठे, असा सवाल उपस्थित झाला आहे. २00२-0३ मध्ये महापालिकेच्यावतीने अकोलेकरांसाठी शहर बस सेवा सुरू करण्यात आली होती. कालांतराने बस वाहतूक सेवेला घरघर लागली. अखेर डबघाईस आलेली शहर बस वाहतूक सेवा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने २0१४ मध्ये घेतला. बस सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांंची चांगलीच कुचंबणा सुरू आहे. शहरवासीयांची गरज ओळखून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी प्रशासनाच्या सोयीचा करारनामा तयार करून निविदा अर्ज बोलावले. यामध्ये श्रीकृपा ट्रॅव्हल्स नागपूरच्यावतीने सर्वाधिक २ रुपये ११ पैसे प्रतिकिलोमीटर दराची निविदा प्रशासनाने मंजूर केली. संबंधित कंपनीकडून मनपाला वार्षिक ४६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होईल. जानेवारी महिन्यात बस सेवा सुरू करण्याचा दावा संबंधित कंपनीने केला होता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाच सिटी बस उपलब्ध करून दिल्यानंतर अकोलेकरांच्या अपेक्षा जागृत झाल्या. आता २0 दिवस उलटून गेल्यावरही बस सेवा सुरू होण्याची लक्षणे दिसत नसल्याने अकोलेकर अस्वस्थ झाले आहेत. थकबाकी अदा केल्यावर परमिट? शहरात दाखल झालेल्या पाच सिटी बसेसला उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ)विभागाने अद्यापही परमिट मंजूर केले नाही. आरटीओच्या नियमानुसार यापूर्वी बंद पडलेल्या सिटी बसेसची थकीत रक्कम मनपा प्रशासनाने जमा न केल्यामुळे नवीन बसेसला परमिट मिळण्यास विलंब होत आहे. ही रक्कम सुमारे ४0 लाखांच्यावर आहे. जिल्हाधिकार्‍यांनी घ्यावा पुढाकार! शहर बस वाहतूक सुरू करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. अकोलेकरांची गरज ओळखून बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेऊन ह्यआरटीओह्ण विभागासोबत समन्वय साधण्याची गरज आहे.