शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

पांढरं सोनं काळवंडलं!, कापसाचे ‘अर्थशास्त्र’ कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:38 PM

कापूस हे विदर्भातील मुख्य नगदी पीक असले, तरी राज्यातील मराठवाडा, खान्देशसह जवळपास सर्वच भागात आता घेतले जात आहे.

राजरत्न सिरसाट अकोला : कापूस हे विदर्भातील मुख्य नगदी पीक असले, तरी राज्यातील मराठवाडा, खान्देशसह जवळपास सर्वच भागात आता घेतले जात आहे. म्हणूनच खरिपाच्या १ कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी कापूस ४१.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर टिकून आहे. कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र या पिकावर अवलंबून आहे. वर्षभराची सर्व उधारी, उसणवारीचे व्यवहार याच पिकावर ठरलेले असतात. यामध्ये मुला-मुलींच्या लग्नाचाही समावेश आहे. म्हणूनच या पिकाला ‘पांढरं सोनं’ संबोधले जाते, पण पावसाची अनिश्चितता, उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने पांढरं सोनं काळवंडल्याचे दिसत आहे.राज्यात मुख्यत्वे विदर्भ, मराठवाड्यात पारंपरिक पिकाऐवजी शेतकरी सोयाबीनच्या पिकाकडे वळला, पण पारंपरिक कापसाचे पीक शेतकरी घेतातच, म्हणूनच राज्यात गतवर्षी सोयाबीनचे ३८ तर कापसाचे क्षेत्र ४१.९८ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले होते. कापूस संवेदनशील पीक आहे. पेरणी ते काढणीपर्यंत या पिकाची काळजी घ्यावी लागते. खते, कीटकनाशके, कोळपणी, इतर आवश्यक या पिकांच्या गरजा पूर्णच कराव्या लागतात, पण उत्पादन खर्चावर दर मिळत नाही. या पिकाच्या उत्पादनावर वर्षाचे आर्थिक व्यवहार केलेले असल्याने शेतकरी ही परतफेड करू शकत नाहीत. परिणामी, कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकरी आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घेत आहेत.या वर्षीचा उत्पादन खर्च!२०१७-१८ वर्षीचा उत्पादन खर्च हा हेक्टरी ४१ हजार ०६५ रुपये एवढा आला आहे. हेक्टरी सरासरी उत्पन्न हे २५ क्विंटल अपेक्षित होते. एवढे उत्पन्न जर झाले असते, तर आधारभूत किमतीनुसार ९७ हजार ५०० रुपये मिळाले असते. म्हणजेच यातून ४१ हजार ६५ रुपये वजा केले, तर शेतकºयांना ५६ हजार ४३५ रुपये नफा झाला असता, पण प्रत्येक वर्षी शेतकºयांसाठी हे मृगजळच ठरत आहे.विदर्भाचे उत्पादन घटले!मागील वर्षी विदर्भाला ३८ लाख गाठी कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात३२ लाख गाठी उत्पादन झाले.म्हणजेच विदर्भात २५ टक्के कापसाचे उत्पादन घटले.>राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्टÑ, तसेच पश्चिम महाराष्टÑातील काही भागात कापसाचे पीक घेतले जाते. मागील वर्षी या क्षेत्रात १० टक्के वाढ झाली. म्हणजेच ४१.९८ लाख हेक्टरवर कापूस पीक घेण्यात आले. त्यामुळे उत्पादनाचे उद्दिष्ट हे १०० लाख गाठी होते. प्रत्यक्षात ८५ लाख गाठी उत्पादन झाले. २०१६-१७ मध्ये राज्यातील कापसाचे क्षेत्र ३८ लाख हेक्टर होते, पण उत्पादन ८८.५० लाख गाठी झाले होते. म्हणजेच २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या वर्षी हे उत्पादन ३ लाख ५० हजार गाठी कमी आहे. कमी पाऊस आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर हा परिणाम झाल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला.>वर्षे क्षेत्र उत्पादन उत्पन्न(लाख/हे.) (लाख गाठी) (रू ई किलो/हे.)२००८-०९ ३१.४३ ६२.०० ३५५२००९-१० ३५.०३ ६५.७५ ३१९२०१०-११ ३९.४२ ८७.७५ ३७८२०११-१२ ४१.२५ ७६.०० ३१३२०१२-१३ ४१.४६ ८१.०० ३३२२०१३-१४ ४१.९२ ८४.०० ३४१२०१४-१५ ४१.९० ८०.०० ३२४२०१५-१६ ४२.०७ ७६.०० ३०७२०१६-१७ ३८.०० ८८.५० ३९६२०१७-१८ ४१.९८ ८५.०० ३४४>आधारभूत किंमतवर्ष मध्यम धागा लांब धागा(प्रतिक्ंिवटल/रुपये)२००९-१० २,५०० ३,०००२०१०-११ २,५०० ३,०००२०११-१२ २,८०० ३,३००२०१२-१३ ३,६०० ३,९००२०१३-१४ ३,७०० ४,०००२०१४-१५ ३,७५० ४,०५०२०१५-१६ ३,८०० ४,१००२०१६-१७ ३,८६० ४,१६०२०१७-१८ ४,०२० ४,३२०मागील वर्षी कापसाला हमी दर ४,३२० रुपये प्रतिक्विंटल होता. सरासरी हेक्टरी उत्पादन बघितल्यास ४ क्व्ािंटल एवढेच होते. काही भागांत हे उत्पादन एक ते दोन क्ंिवटल एवढेच होते. हेक्टरी उत्पादन खर्च बघितल्यास तो ४१ हजार ०६५ एवढा आला. म्हणजेच मागील वर्षी शेतकºयांचे या पिकात प्रचंड नुकसान झाले.