शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महापौर पदाचा शिलेदार कोण?

By admin | Published: February 25, 2017 2:27 AM

नाव निश्‍चित करण्यासाठी भाजपला ७ मार्चपर्यंतची मुदत

अकोला, दि. २४-भारतीय जनता पार्टीला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता भाजपच्या अंतर्गत वतरुळात महापौरपदासाठी हालचालींना सुरुवात झाली आहे. महापौरपदाच्या निवडीसाठी नियमानुसार ८ मार्च रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करावे लागणार असल्यामुळे महापौरपदाचा दावेदार निश्‍चित करण्यासाठी भाजपकडे ७ मार्चपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे महापौरपदाचा शिलेदार कोण, याकडे संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.अकोल्याचे महापौरपद खुला सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले. त्यामुळे महिला किंवा पुरुष अशा दोन्ही व्यक्तींना महापौरपदाचा दावा करता येणार आहे. महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी उदयास आली. अकोलेकरांनी भाजपच्या पारड्यात ८0 जागांसाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ४८ जागांचे दान दिले. भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय मानल्या जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करताना आजपर्यंत होणार्‍या घोडेबाजाराला आपसूकच लगाम बसला. महापौरपदाचे आरक्षण पाहता भाजपमधील प्रभावी उमेदवारांनी महापौरपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अकोला शहरातील विकास कामांचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा तसेच मनपा प्रशासनाकडून होणारी अंमलबजावणी पाहता आगामी दिवसांत विकास कामांना गती येणार असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच महापौरपदाचा दावेदार वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ व पक्षाच्या विचारधारेला अनुसरून काम करणारा असावा, यावर भाजपमध्ये काथ्याकू ट सुरू आहे. महापालिकेत भाजपचा कालावधी पाहता आजपर्यंत महापौरपदासाठी पक्षाने महिलांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते. यावेळी पुरुषांना प्राधान्य दिल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानुषंगाने खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर तसेच महानगराध्यक्ष कि शोर पाटील मांगटे यांनी चाचपणी सुरू केल्याची माहिती आहे. ७ मार्चपर्यंत महापौरपदाच्या नावावर पक्षाला शिक्कामोर्तब करावे लागणार असल्यामुळे लाल दिव्याची गाडी कोणाच्या वाटेला येणार, याविषयी अकोलेकरांची उत्सुकता शिगेला ताणली आहे. यांच्या नावाची चर्चा!महापौरपदासाठी पक्षात विजय अग्रवाल, हरीश आलिमचंदानी, विजय इंगळे, सारिका जयस्वाल, योगीता पावसाळे, अनिल गरड, मिलिंद राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. असे असले तरी ऐनवळी समीकरणांमध्ये फेरबदल होऊ शकतात.