मोठ्या उमरीतील इसमास मारहाण
अकोला : सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठी उमरी परिसरात रहिवासी असलेल्या एका इसमास बाजूलाच असलेल्या एका दुकानदाराने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे पुलाचे काम थंड बस्त्यात
अकोला : अकोल्यावरून डाबकी रोड गायगावकडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे पुलाचे बांधकाम थंड बस्त्यात आहे. एक वर्षापासून या पुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहे.
जिजाऊनगरमध्ये झाड कोसळले
अकोला : कौलखेड तुकाराम चौक रिंग रोडवरील जिजाऊनगरमध्ये वडाचे झाड कोसळल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. या परिसरात वडाची दोन झाडे असून त्यामध्ये एक झाड बाजूच्या मैदानात उन्मळून पडले आहे.
हॉस्पिटलसमोर वाहनांची गर्दी
अकोला : सिव्हिल लाइन्स चौकाकडून जवाहरनगरकडे जाणाऱ्या रोडवर तीन ते चार हॉस्पिटलसमोर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या हॉस्पिटल संचालकांना समज देऊन रस्त्यावरील वाहने वाहनतळावर तसेच शिस्तीत लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.