लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात येत्या ४८ तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे. रविवारीही ही शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार वाशिम येथे विदर्भात सर्वाधिक ३०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; परंतु वाशिमला लागूनच असलेल्या अकोला जिल्ह्यात शून्य पाऊस झाला आहे. तशी नोंद नागपूर वेधशाळेने केली आहे.शुक्रवार-शनिवारी पूर्व विदर्भात गडचिरोलीत दमदार पाऊस झाल्यानंतर उर्वरित विदर्भातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; परंतु दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. रविवारी विदर्भातील वाशिम जिल्हा सोडला, तर अमरावती येथे केवळ २.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा येथे ९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरी येथे ११.२, चंद्रपूर ७.८, गोंदिया २.०, नागपूर येथे १.३ मि.मी., वर्धा १.० मि.मी., तर यवतमाळ येथे १३.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा!
By admin | Published: July 17, 2017 3:33 AM