अकाेला : चांदूर येथील रहिवासी श्रीराम बाबूराव सपकाळ यांची हत्या त्यांच्या मानलेल्या जावयानेच केल्याचे समाेर आले आहे. मनाेज इंगळे असे आराेपीचे नाव असून, त्याची पत्नी नादांयला परतली नसल्याचा रागातून त्यांनी सासरे श्रीराम सपकाळ यांची हत्याच केल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणात
खदान पाेलीस मनाेजच्या मागावर आहेत.
श्रीराम सपकाळ यांची कापशी येथे दुसरी पत्नी असून, त्यांच्या भारती नामक मुलीचे लाॅकडाऊनच्या काळात मनाेज इंगळे (रा. जेतवननगर) याच्याशी लग्न लावून दिले हाेते. त्यानंतर भारती काही दिवस मनाेजसाेबत राहिली, मात्र परत माहेरी गेल्यानंतर मनाेजकडे आलीच नाही. त्यामुळे मनाेज इंगळे याने त्याचे सासरे श्रीराम सपकाळ यांना पत्नीला परत पाठविण्याची मागणी केली. मात्र पत्नी परत येत नसल्याने तसेच मनाेजच्या घरातील पैसेही घेऊन गेल्याने संतापल्याने मनाेज इंगळे याने शनिवारी सायंकाळी त्याचे सासरे श्रीराम सपकाळ यांची निमवाडी परिसरात धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केली. या घटनेनंतर पाेलिसांनी मनाेज इंगळे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा शाेध सुरू केला आहे. पाेलिसांनी त्याचे लाेकेशन घेतले असून, त्याला अटक करण्यात येणार आहे.
........................................
काेट
मनाेज इंगळे याची पत्नी घरातील पैसे घेऊन गेल्यानंतर ती परत येत नसल्याने त्याने रागाच्या भरात श्रीराम सपकाळ यांची हत्या केली. पाेलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शाेध सुरू केला आहे. आराेपीच्या मागावर पाेलीस असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे.
डी. सी. खंडेराव
ठाणेदार, खदान पाेलीस स्टेशन