तालुक्यातील ६६ ग्राम पंचायतींपैकी ३८ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून जुळवाजुळव सुरू केली आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या ३८ ग्राम पंचायतींच्या निवडणुकांसाठी स्थानिक सर्वच राजकीय पक्षांचे आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी आपलेच पॅनल विजयी व्हावे, यासाठी मतदार राजाकडे विनवण्या सुरू केल्या आहेत.
धनेगाव ग्राम पंचायत मागील एकच वेळा अविरोध झाली होती . आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने अनेक गावात अविरोध सदस्यसंख्या मोठ्या प्रमाणात असते. ३४६ सदस्यांसाठी होणाऱ्या सदस्यसख्या असलेल्या ग्राम पंचायती १) वाडेगाव, पारस १७-१७ (२) हातरुण , व्याळा , लोहारा , १३ सदस्य संख्या (३) रिधोरा , देगाव , अंदुरा ,कान्हेरी (गवळी) ,गायगाव , हाता , निंबा येथे ११ सदस्य संख्या राहील( ४)उरळ बु. , अंञी (मलकापूर) , डोंगरगाव ,खंडाळा , बटवाडी बु. , चिचोली (गणू), नकाशी , मांजरी , खिरपुरी बु., निमकर्दा येथे ९ सदस्य संख्या आहे. (५)नांदखेड , धनेगाव , मानकी , काझीखेड , बटवाडी खु.,बोरगाव (वैराळे), कवठा , पिपळगाव , कसुरा , मालवाडा , खामखेड , सोनाळा , नया अंदुरा , उरळ खु. , खिरपुरी खु. , मांडोली येथे ७ सदस्य संख्या आहे. अश्या ३८ ग्राम पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
---------
पाच वर्षांपूर्वी नागरिकांनी सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आजी, माजी सरपंच यांना एकत्र करून मागील ग्राम पंचायत निवडणूक अविरोध केली. यावेळीही मतदार नागरिकांनी एकत्र येऊन सर्व संमतीने सातही सदस्य अविरोध करावे. ग्रामविकासासाठी मतदार एकत्र येऊ शकतात; परंतु राजकीय पदाधिकारी येत नाहीत व येऊही देत नाहीत, ही शोकांतिका आहे.
-गजानन लांडे, माजी सरपंच, ग्रामपंचायत, धनेगाव