------------------------
डोंगरगाव वादळ-वाऱ्यासह पाऊस
डोंगरगाव: अकोला तालुक्यातील डोंगरगाव परिसरात वादळ-वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळ-वाऱ्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील डोंगरगाव फाट्यावर काटेरी झाडाची फांदी पडली होती. त्यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत होती.
---------------------
क्षुल्लक कारणावरून वाद, गुन्हा दाखल
उरळ: जुना अंदुरा येथे गजानन नामदेव वाडकर हे बांधकाम करीत असताना, फिर्यादी नलिनी वडतकार या महिलेने त्यांना हटकले असता, आरोपी गजानन वाडकर व मुलगा योगेश वाडकर यांनी महिलेस मारहाण केली. या प्रकरणात नलिनी वडतकार यांनी दि. २८ मे रोजी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, उरळ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार अनंत वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुलताने व पो.कॉ ज्ञानेश्वर फाळके तपास करीत आहेत.
----------------
टाकळी खुरेशी येथे जोरदार पाऊस
बाळापूर: तालुक्यातील टाकळी खुरेशी परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. रविवारी पाऊस सुरू होताच, परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
-----------------------
पिंजर भागात हळदी पीक बहरले
निहिदा: पिंजर भागातील काही शेतकऱ्यांनी हळद पिकाची पेरणी केली आहे, टिटवा येथील बबनराव गावंडे आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली असता, सद्यस्थितीत हळदीचे पीक बहरले आहे.
------------------------------
लॉकडाऊनमुळे टरबूज उत्पादक शेतकरी संकटात
पातूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. बाजारपेठ बंद असल्याने, पातूर परिसरात शेतकरी मातीमोल भावाने फळांची विक्री करीत आहेत.
------------------
अकोटः सहा ठिकाणी कोरोना चाचणी शिबिर
अकोट : अकोट शहरात कोरोना चाचणी अहवाल असल्याशिवाय पेट्रोल-डिझेल देण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची सोय व कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोट शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप अंजनगाव रोड अकोट, दगडी शाळा, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अकोट, एम.एस.अग्रवाल पेट्रोल पंप, अकोला रोड अकोट, नंदिकेश्वर पेट्रोल पंप, दर्यापूर रोड अकोट, भुईभार पेट्रोल पंप, हिवरखेड रोड, अकोट व गजानन पेट्रोल पंप, किनखेड फाटा येथे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
-----------------------------
बाळापूर तालुक्यात आणखी १३ पॉझिटिव्ह
बाळापूर : तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार, १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
-----------------------
अकोट तालुक्यात आणखी २५ पॉझिटिव्ह
अकोट : तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार, १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन होत आहे.
-------------------
पीक विम्याची मदत देण्याची मागणी
तेल्हारा: अकोट उपविभागातील तेल्हारा व अकोट तालुक्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन व केळी पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे सोयाबीन व केळी पिकासाठी पीक विम्याची मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
---------------------