अकोला: पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळल्यानंतर अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. ही आव्हाने, समस्या, कर्मचाºयांचे प्रश्न सोडविण्यासोबतच प्रोफेशन पोलिसिंग राबविण्यावर आपला भर राहणार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी आणखी बळकट करण्यास प्रथम प्राधान्य देऊ, अशी माहिती पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिली.शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते पत्रकारांसोबत संवाद साधत होते. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. येत्या काळात सण, उत्सव लक्षात घेता, नियोजन करण्यात येत आहे. तडीपार करण्यात आलेले गुंड शहरात फिरून कायदा व सुव्यवस्था बाधित करू शकतात. त्यासाठी तडीपार गुंडांचा शोध घेऊन त्यांना जिल्ह्याबाहेर सोडण्यात येत आहे. घरफोडी, चोरी प्रकरणातील आरोपींना गजाआड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासोबत प्रत्येक पोलीस ठाणयांमध्ये नागरिकांच्या शेकडो तक्रारी प्रलंबित आहेत. या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम करून नागरिकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा विश्वासही पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी व्यक्त केला. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांबाबतच्या तक्रारींकडेसुद्धा लक्ष देण्यात येईल. सण, उत्सवाच्या काळात पोलिसांवर कामाचा ताण येतो. तो दूर करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न केले जाते. लाचखोर अधिकारी, कर्मचाºयांच्या बाबतीत आपली सदैव कठोर भूमिका राहील. शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी नियोजन केले असून, वाहतूक नियंत्रण कक्षाला काही टार्गेट दिले आहेत. पोलीस निवासस्थाने, पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या, अवैध वाहतुकीबाबत निर्णय घेण्यात येतील. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्याचा निपटारा करण्यावर आपला भर राहील, अशी माहितीही पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिली.
शिकवणी वर्ग, शाळा-महाविद्यालयांकडे विशेष लक्षशिकवणी वर्ग, शाळा-महाविद्यालय परिसरामध्ये छेडखानी, गुंडगिरी, खंडणी वसूल करण्याचे प्रकार लक्षात घेता, या ठिकाणांवर आपण विशेष लक्ष केंद्रित करू आणि संबंधित पोलीस अधिकाºयांना या ठिकाणी गस्त वाढविण्यास आणि कारवाई करण्याचे आदेश देण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सांगितले.
डीबी स्क्वॉडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्राधान्य!पोलीस ठाण्यांमध्ये असलेले डीबी स्क्वॉड केवळ जुगार, वरली, अवैध दारू अड्ड्यांवर छापा घालण्यापुरतेच मर्यादित असल्याच्या प्रश्नाच्या उत्तरात पोलीस अधीक्षक गावकर यांनी, डीबी स्क्वॉडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाºया पोलीस कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. पोलीस कर्मचाºयांच्या बद्दल कोणाची तक्रार असल्यावर त्यावर कारवाई करण्यात येईल. भ्रष्ट अधिकारी, कर्मचाºयांवर विशेष लक्ष ठेवू, असे सांगितले.बदल्यांसंदर्भात कठोर भूमिकाज्या पोलीस कर्मचाºयांची ठाण्यांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरी झाली आहे, त्यांची बदली झालीच पाहिजे. अशी आपली भूमिका आहे. अधिक काळ पोलीस ठाण्यात घालविण्यानंतर लागेबांधे तयार होतात, असे होऊ नये. असा आपला मानस असल्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सांगितले.