..........................
निवासी डॉक्टरांवर कोविडचा ताण!
अकोला : सर्वोपचार रुग्णालयावरील कोविड रुग्णांचा ताण वाढला असून, रुग्णसेवेची मदार निवासी डॉक्टरांवर आहे. सर्वोपचार रुग्णालयात ८१ निवासी डॉक्टर असून, त्यांच्यावर कोविड आणि नॉनकोविड वॉर्डाचा भार आल्याचे चित्र दिसून येते.
..........................
उन्हाचा कडाका वाढला, प्रकृतीला सांभाळा!
अकोला : जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली असून, एप्रिल महिन्यातील आगामी दिवस तापमान वाढीचेच आहेत. वाढत्या उष्म्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारींनी डोके वर काढले आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करा व आहारविषयक काळजी घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
..........................
वाटिका चौकात अपघाताची भीती
अकोला : अशोक वाटिका चौक हा वर्दळीचा चौक असून, येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. चौकात उड्डाण पुलाचे निर्माण कार्य सुरू असून, या ठिकाणी वाहतूक सुरू असतानाच, वेल्डिंगचे काम करण्यात येत आहे. हा प्रकार मोठ्या अपघातास निमंत्रण देणारा ठरत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
..........................
कोविड अहवालासाठी रुग्णांची फरपट
अकोला : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढले. मात्र, चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह हे कळण्यासाठी संदिग्ध रुग्णांना तीन तेच चार दिवस अहवालच मिळत नसल्याचे समोर आले आहे.
..........................