लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुणवंत विद्यार्थी राष्ट्राची संपत्ती आहेत. त्यांच्यासाठी उत्तम वातावरण तयार करण्याचे कार्य पालकांचे आहे. जीवन एक संधी असून, या संधीचे सोने करीत आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. यशस्वी होण्याकरिता तीव्र व प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि मेहनतीसोबतच वातावरणही आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी आपल्यातील प्रतिभा ओळखायला पाहिजे आणि पालकांनी त्याला नि खरण्यासाठी मदत केली पाहिजे, असा सल्ला उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी विद्यार्थ्यांना दिला.एमआयडीसी स्थित लोकमत भवनमध्ये लोकप्रज्ञा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रा. खडसे बोलत होते. याप्रसंगी लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले, लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा उपस्थित होते. प्रांरभी लोकमतचे संस्थापक अध्यक्ष स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन, तसेच मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. रवी टाले यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. अरुणकुमार यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांना गौरविण्यात आले. एकूण ६५ विजेतांपैकी २९ विद्यार्थ्यांना रोख रक्कम, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र, तसेच ३६ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. संचालन निशाली पंचगाम यांनी केले. आभार लोकमतचे प्रशासन अधिकारी रवींद्र येवतकर यांनी मानले.
प्रज्ञावंतसुहानी शिंदे, सानिका काळणे, रितेश देशमुख, मृन्मयी हातवळणे, प्रथमेश पा थरकर, दुर्गा नागराज, यशराज तायडे, सायली होटे, अथर्व येंडे, रेणुका शहापुरे, हर्ष पाठक, सोनल गाडगे, साक्षी संगारे, सायली चोपडे, चंचल पाठक, सलोनी जैन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ओम वानखडेला विशेष पुरस्कारराज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत ओम वानखेडे याने रौप्य पदक मिळविल्याबद्दल त्याला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लोकप्रज्ञा पुरस्कार विजेतेसिद्धी पवार, अक्षरा लांडे, सोपान गावत्रे, उत्कर्ष नाल्हे, आदित्य गाडगे, मोहित गुल्हाने, बरवा बोडखे, तन्वी काकड, वैष्णवी हाके, नंदिनी गेडाम, गौरव तायडे, भक्ती लाहोळे, सानिया उज्मा मो.रियाज, प्रतीक्षा ढोले, समीक्षा जैन, तेजस पोदुतवार, अनुराधा हाके, जीगिशा देशमुख, श्रीश जामोदे, वैष्णवी पाथरकर, साहिल तायडे, सोहम कीर्तिवार, तेजस डहाके, प्रणय तायडे, नम्रता खेरडे, प्राची पुराणे, वैष्णवी काळे, निशा वानखडे, चिन्मय ढोले, देवयानी गोतमारे, समृद्धी क्षीरसागर, क ार्तिक तेलंग, निखिल रोकडे, मिलिंद गेडाम, ओम कुटे, सिद्धेश येवतकर, अशना अंजुम मो इजाज शेख कादर, गणेश हरमकर, राम हातवळणे, ऋतुजा गिर्हे, तन्मय पोदु तवार, प्रणव खोडके, श्रीपाद गिर्हे, गार्गी देशमुख, वैष्णवी धामणकर, मयूरी होटे, विजय क्षीरसागर, कृष्णा वाळके, अभिषेक धोटे,..