पातूर: तालुक्यात बुधवारी रात्री वादळी वार्यासह तुफान पाऊस झाला. काही वेळ विजेचा गडगडाटही झाला. काही ठिकाणी टिनपत्रे उडून गेली. अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामस्थांची धांदल उडाली. जवळपास तीन तास विद्युत पुरवठा खंडित होता. एक ठिकाणी सुरू असलेले बांधकामही कोसळले. जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी तापमानात वाढ झाली. दोन्ही दिवस दुपारनंतर मात्र ढगाळ वातारणामुळे तापमानात घट झाली. पातूर तालुक्यात संध्याकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास गार हवा सुटली. त्यानंतर पातूर शहरासह परिसरात तुफान पाऊस झाला. बाजारपेठेत आलेले ग्राहक व व्यावसायिकांची धावपाळ झाली. बसची प्रतीक्षा करीत असलेले प्रवासी सुरळीत स्थळी गेले.
वादळी वा-यासह दमदार पाऊस
By admin | Published: April 07, 2016 1:57 AM