- संजय खांडेकरअकोला : दोन लाखांवर रोख काढणाऱ्या प्रत्येक बँक खातेदाराची नोंद थेट निवडणूक आयोगाकडे दररोज रेकॉर्ड होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन लाखांवर रोख रक्कम काढणारे निवडणूक आयोगाच्या रडारवर असल्याने अनेकांची चौकशी होण्याचे संकेत आहेत.राष्ट्रीयीकृत बँका, शेड्युल बँका, को-आॅपरेटिव्ह बँकेतून दररोज कोट्यवधीची रोख उलाढाल होत असते. स्थानिक बँकेतून ही माहिती मुख्य शाखेला देणे कामाचा दैनंदिन भाग असतो; मात्र जेव्हापासून बँकेचे व्यवहार संगणीकृत आणि आॅनलाइन बँकिंग पद्धतीने जोडले गेले, तेव्हापासून प्रत्येक स्थानिक बँकेची दैनंदिन माहिती मुख्य शाखेला द्यावी लागत असे. त्यानंतर दोन लाखांवर जर कुण्या बँक खात्यातील रक्कम काढली जात असेल किंवा टाकल्या जात असेल, तर त्याची माहिती रिझर्व्ह बँकेला देणे २०१२ च्या नियमावलीनुसार बंधनकारक केली. त्यामुळे २०१२ नंतर दोन लाखांवर होणाऱ्या प्रत्येक उलाढीलीची नोंद तांत्रिक यंत्रणेतून तातडीने पोहोचत आहे; मात्र निवडणूक आयोगाने अलीकडे रिझर्व्ह बँकेचा डेटा स्वत:कडे लिंक करून घेतल्याने आता स्थानिक बँकेत होत असलेली उलाढालदेखील आयोगाकडे तातडीने पोहोचत आहे. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे बँक खाते आणि त्यांच्या नातेवाइकांची माहिती टिपण्याचे संकेत बँक शाखाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे बँक अधिकारी उमेदवारांच्या खात्यावर लक्ष ठेवून आहेत; पण उमेदवाराच्या नातेवाइकांवर लक्ष तरी कसे ठेवावे, हा पेच अधिकाºयांना पडला आहे.
दोन लाखांवर बँकेतून कॅश काढणाºया प्रत्येकाची माहिती रिझर्व्ह बँके कडे आपसूकच जाते. २०१२ पासून बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक यंत्रणेत त्या प्रकारचा बदल केलेला आहे. आरबीआयने ही यंत्रणा निवडणूक आयोगाशी जोडली आहे. जर या व्यवहारासंदर्भात काही संशय जाणवत असेल, तर आयटी विभागाकडून थेट संबंधित बँक मॅनेजरला नोटीस येते.- आलोककुमार तरेनिया, एलडीएम, अकोला.