अकोला : प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील विविध धोरण व न्याय मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात शासनाने १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन निर्णय मागे घ्यावा, विद्यार्थी गणवेश व शिक्षक ड्रेसकोड बाबतीत घेण्यात आलेल्या धोरणांत बदल करावा, शिक्षकांकडील ऑनलाईन व अशैक्षणिक कामे बंद करावीत, समूह शाळा धोरण, दत्तक शाळा योजना रद्द करण्यात यावी, अकोला जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांची तत्काळ सोडवणूक व्हावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी गोपाल सुरे, जिल्हा कार्याध्यक्ष व केंद्र प्रमुख किशोर काेल्हे, जि.प. शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक विजय टोहरे, मारोती वरोकार, प्रशांत अकोत, अनिल पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र फोकमारे, मंगेश देशपांडे, राजेश कराळे, सुधिर डांगे,आतिश तराळे, अनंत हिरोळकर, अरविंद आगाशे, विकास राठोड, कैलास पुंडे आदी उपस्थित सहभागी झाले होते.