शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

एजंटशिवाय आरटीओ कार्यालयात काडीही हालत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 10:38 AM

RTO office News : लर्निंगवगळता इतर सर्व कामांसाठी अधिकारीच नागरिकांना एजंटकडे पाठवत असल्याचे या पडताळणीदरम्यान समोर आले.

- सचिन राऊत

अकाेला : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सामान्यांना त्रासदायक ठरत आहे. याठिकाणी कोणतेही काम वाढीव पैसे दिल्याशिवाय होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव असून, ‘लोकमत’ने पडताळणी केली असता, एजंटविना कार्यालयात काडीही हालत नसल्याचे दिसून आले. लर्निंगवगळता इतर सर्व कामांसाठी अधिकारीच नागरिकांना एजंटकडे पाठवत असल्याचे या पडताळणीदरम्यान समोर आले. यातून नागरिकांनाच त्रास झाल्याचे वास्तव आहे. आरटीओ कार्यालयातील कामकाजातून एजंटांना दूर करण्यासाठी बहुतांश कामे ऑनलाइन करण्यात आली आहेत. मात्र त्यानंतरही एजंटाचाच बाेलबाला असल्याचे दिसून येत आहे.

वाहन फिटनेस सर्टिफिकेट

वाहन फिटनेससाठी चारचाकी, ट्रक तसेच पिकअप या वाहनांसाठी ६०० ते १२०० रुपये शासकीय शुल्क आहे; परंतु येथे पाच हजारांपर्यंत वसुली केली जाते.

 

पर्मनंट लायसन्स

पर्मनंट लायसन्सची शासकीय शुल्क ही ७०० ते एक हजार एवढी आहे; परंतु प्रत्यक्षात नागरिकांना साडेतीन हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचे दिसून आले. हे प्रत्येक काम ऑनलाइन असले तरी मात्र तुम्हाला एजंटमार्फतच जावे लागते.

गाडी दुसऱ्याच्या नावावर करणे

दुचाकी ते मोठी वाहने विक्री केल्यानंतर दुसऱ्याच्या नावावर करण्यासाठी ४०० ते दाेन हजार एवढा शासकीय खर्च आहे. प्रत्यक्षात मात्र दुप्पट पैसे नागरिकांना द्यावे लागतात.

 

आरटीओ कार्यालयाचा भूलभुलय्या

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परवानाधारक ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून काही जण कामकाज करतात. त्यांना अधिकारीच नागरिकांकडून अधिकचे पैसे घेण्याची सक्ती करत असल्याचे यावेळी दिसून आले. एका कामामागे दीड हजारपर्यंत रक्कम वसूल केली जाते.

अधिकारी म्हणतात, ते तर वाहनमित्र !

याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, आरटीओ कार्यालयाच्या आवारात कार्यरत एजंट नसून वाहनमित्र आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार एखाद्याने त्यांना काम दिल्यास ते आरटीओमार्फत करू शकतील, त्याला कोणतेही निर्बंध नसल्याचे सांगितले.

 

एजंटांची संख्या प्रचंड

दरम्यान, कार्यालयात पाय ठेवल्यानंतर एजंटांचाच गराडा पडल्याचे दिसून आले. या एजंटांकडे कामाला असलेले छोटे एजंट सतत धावपळ करताना दिसले. यावरून आरटीओ कार्यालयातील संपूर्ण कामकाज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमलेले एजंटच करीत असल्याचे चित्र आहे.

बहुतांश एजंटांना आरटीओचे अधिकारीच बोलावणे पाठवून कामे साेपवत असल्याचे या पडताळणीत दिसून आले.

एजंटकडून गेले की झटपट आणि विनातक्रार हाेते काम

अधिकाऱ्यांनी एजंटकडे एखाद्या अडल्या-नडल्या व्यक्तीला पाठवल्यानंतर काही मिनिटात पैसे देऊन ते काम पूर्ण होत असल्याचे यावेळी दिसून आले. बहुतांश नागरिक काम लवकर व्हावे यासाठी वाढीव पैसे देऊन काम मार्गी लावत असल्याचे चित्र होते. आरटीओ टेस्ट तसेच इतर अनेक कामांसाठी ऑनलाइन सिस्टीम असतानाही आरटीओ कार्यालयातूनच एजंटांनाच संपर्क साधण्याचे सांगण्यात येत होते.

 

लर्निंग लायसन्ससाठी सारथी ॲपवर अर्ज केला होता. तारीख मिळाली; पण ऐन चाचणीच्या वेळी कागदपत्रांची मागणी करण्यात आली. एजंटकडे गेल्यानंतर काम तातडीने पूर्ण झाले.

- १९ वर्षीय युवक, अकाेला

चारचाकी वाहन नावावर करून घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा मारत आहे; परंतु वाहन दुसऱ्या आरटीओ कार्यालयाच्या हद्दीतील आहे. तेथून हे आणा, ते आणा, असे केले जात आहे. अधिकारी एजंटला भेटा म्हणून सांगतात.

-वाहनमालक महिला, अकाेला

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAkolaअकोला