अकोला : वाढदिवस साजरा न करता विधी महल्ले या १४ वर्षीय बालिकेने शुक्रवारी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या रुग्णवाहिकेला एक ऑक्सिजन सिलिंडरची भेट दिली. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होणार असल्याने, बालिकेने वाढदिवसाला सामाजिक बांधीलकी जोपासल्याचा प्रत्यय दिला आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील मोझरी येथील विधी महल्ले या १४ वर्षीय बालिकेचा ३० जुलै रोजी वाढदिवस होता; मात्र वाढदिवस साजरा न करता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी कक्षात विधीने रुग्णांच्या सुविधेसाठी एक ऑक्सिजन सिलिंडर संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या रुग्णवाहिकेला भेट दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, विधीचे वडील सुधाकर महल्ले, संत गाडगेबाबा आपात्कालीन बचाव व शोध पथकाचे अध्यक्ष दीपक सदाफळे उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून विधीने रुग्णवाहिकेला दिलेल्या ऑक्सिजन सिलिंडरच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गाजावाजा न करता रुग्णवाहिकेला ऑक्सिजन सिलिंडर भेट देऊन बालिकेने सामाजिक बांधीलकी जोपासल्याचा प्रत्यय आणून दिला.
वाढदिवस साजरा न करता विधीने खाऊच्या पैशातून संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव व शोध पथकाच्या रुग्णवाहिकेला एक ऑक्सिजन सिलिंडर दिले आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
दीपक सदाफळे
अध्यक्ष, संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव व शोध पथक, पिंजर.
................फोटो........................