शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
2
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
5
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
6
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
7
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
8
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
9
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
10
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
11
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
12
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
13
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
14
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
15
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
16
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
17
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
18
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
19
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
20
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले

एसटी बसमधून महिलेची दागिन्यांची पर्स लंपास

By admin | Published: May 07, 2017 7:37 PM

महिलेची एसटी बसमधून सोन्याच्या दागिन्यांची पर्स लंपास झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट; गुन्हा दाखलअकोला : लग्नासाठी बाहेरगावी जाणार्‍या महिलेची एसटी बसमधून सोन्याच्या दागिन्यांची पर्स लंपास झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. लग्नसराईचे दिवस आणि उन्हाळी सुट्टय़ांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. एसटी बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी धडपड करीत आहेत. याचा फायदा बसस्थानकावर सक्रिय असलेले चोरटे घेत आहेत. दररोज बसस्थानकावर चोरीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी एका प्रवाशाने मोबाइल चोरताना रंगेहात पकडल्याची घटना घडत नाही तो, पुन्हा रविवारी चोरट्याने महिलेची दागिन्यांची पर्स लंपास केली. डाबकी रोडवरील गुरुदेवनगरात राहणार्‍या अलका सुरेंद्र मोरे (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कार्ला येथे लग्नकार्यात जाण्यासाठी त्या त्यांची आई शोभा पुंडकर यांच्यासोबत नवीन बसस्थानकावर आल्या. बसस्थानकावरील अकोला ते परतवाडा एसटी बसमध्ये त्या चढल्या. बसगाडीमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी असल्याने, त्यांच्या खांद्यांवर लटकवलेली पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. एसटी बसमध्ये बसल्यानंतर त्यांना पर्स दिसून आली नाही. त्यांनी बसगाडीमध्ये पर्स शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु पर्स मिळून आली नाही. अखेर त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार नोंदविली. चोरट्याने लंपास केलेल्या पर्समध्ये सोन्याचा गोफ, सोन्याचे मणी, दोन अंगठी, गळय़ातील लॉकेट असे एकूण ३७ हजार ६00 रुपये किमतीचे दागिने होते. सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. बसस्थानकावर चोरट्यांची टोळी सक्रिय नवीन बसस्थानकावर चोरटे, खिसेकापूंची टोळीच सक्रिय झाली असून, दररोज बसगाडीमध्ये चढणार्‍या प्रवाशांचे मोबाइल, पाकिटे, पर्स लंपास केल्याच्या घटना घडत आहेत. याठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात असूनही सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे बसस्थानकावर तैनात पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.