शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची महिला कर्मचारी पटविणार ओळख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:58 PM

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची महिला कर्मचाऱ्यांकडून ओळख पटविण्यात येणार आहे.

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची महिला कर्मचाऱ्यांकडून ओळख पटविण्यात येणार आहे. त्यासाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील महिला कर्मचाºयांना ओळख पटविण्याचे प्रशिक्षण शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देण्यात आले.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ११ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ज्या मतदान केंद्रांतर्गत मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे, अशा मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांच्या पथकासोबत बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला कर्मचारी राहणार आहेत. त्यामध्ये अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मुस्लीमबहुल ६९ मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी ६९ शिक्षिकांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित शिक्षिकांना १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार व तहसीलदार विजय लोखंडे यांनी संबंधित शिक्षिकांना मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019