शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

वृक्ष वाचविण्याकरीता महिला एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2017 1:39 PM

वनकायदानुसार कारवाई करा ही प्रमुख मागणी करीत सकाळी घरातील हातचे कामे सोडुन रणरागिणी महीला नगरपरिषद कार्यालयावर धडकल्या.

आकोट नगर परिषदवर धडकल्या रणरागिणी विजय शिंदेआकोट:आकोट उपविभागिय अधिकारी(महसुल) यांच्या शासकीय निवासस्थानी वृक्षतोड करणारे रानकसाईवर वनकायदानुसार कारवाई करा ही प्रमुख मागणी करीत सकाळी घरातील हातचे कामे सोडुन रणरागिणी महीला नगरपरिषद कार्यालयावर धडकल्या.केवळ वटपोर्णिमाची पुजा करीत वडाला धागे न बांधता हिरवेगार सर्वचवृक्ष वाचविण्याकरीता ह्या महीला एकत्र आल्या. दारूबंदीकरीता लढा उभारण्याकरीता महीला एकवटले आहेत. पंरतु वृक्ष वाचविण्याकरीता महीलां एकवटल्याची बहुद्या ही पहीलीच घटना आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग आकोट यांचे अख्यारीत एसडीओचे निवासस्थान आहे. या परिसरातील 8 हिरवेगार झाडाची अवैधपणे कटाई करण्यात आली. सा.बा. विभागाने तीन वाळलेल्या झाडाचा लिलाव केला. पंरतु प्रत्यक्षात नगरपरिषदची परवानगी नसलेली मोठमोठी हिरवी झाडे कापली आहेत. तसेच नरसिंग रोडवरील नझुलचे जागेमधील हिरवेगार झाड तोडले असतांना आम्ही पोहचल्याने कटाई करणारा पळुन गेला आहे.या अवैधपणे वृक्ष कटाई प्रकरणाची चौकशी करून संबधीतावर वनकायदानुसार कारवाई करण्याची मागणी वृक्ष लागवड समितीचे अध्यक्षा शोभाताई बोडखे, अर्पणा चिखले,चंचल पिताबंवाले, शोभना भांडे, रूचा ठाकुर, कविता राठोर, दिपाली केवटी राधिका देशपांडे ,मिनाक्षी आडे,मजुषा बोडखे यांचेसह महीलांनी केली. यावेळी मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्षा व सचीव गीता ठाकरे यांनी महीलांचे म्हणणे ऐकुन घेत निवेदन स्विकारले. यावेळी महीलांनी आम्ही झाडे लावतो. शासनसुध्दा चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राबवित आहे. पंरतु खुलेआम वृक्षकटाईमुळे शासनाची बदनामी होत हरताळ फासली जात आहे.त्या दोंघीनी वाचवले झाडआकोट एसडीओ बंगलातील अवैध वृक्ष कटाईचे प्रकरण लोकमतने चव्हाट्यावर आणल्यिनंतर समाजात वृक्ष वाचविण्याकरीता जनजागृती व धडपळ सुरू झाली आहे. आज नरसिंग रोडवर नझुल जागेतील एक हिरवे झाड कटाईची माहीती वृक्ष लागवड समितीचे चंचल पिताबंरवाले व अर्पणाताई चिखले यांना मिळताच ह्या दोंघी तिथं धावुन गेल्या. झाड तोडत असतांनाच परवानगी मागताच वृक्षतोडणाराने पोबारा केला. त्यामुळे पुर्ण झाड आज तरी वाचले.कदाचित ह्या दोघी गेल्या नसत्या तर एक झाड कटले असते. महीलामुळे झाड वाचविण्याचा प्रेरणादायी संदेश समाजात गेला. पंरतु विविध कारणे देत वृक्ष तोडणे सुरू आहे. अधिकारी त्वरीत कारवाई करत नसल्याने वृक्ष तोडणाराचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे फोटो सेशनकरीत झाड लावायचे तरी कशाकरीता असा प्रश्न भेडसावत असल्याने वृक्ष वाचविण्याकरीता लागवडी प्रमाणे सर्वानी एकवटने गरजेच झाले आहे.