अकोला: नवीन बसस्थानकाजवळील पेट्रोल पंपाजवळ कर्तव्य बजावणाºया महिला वाहतूक पोलीस कर्मचाºयाला दुचाकी अडविल्याच्या कारणावरून सैनिकाने मारहाण केल्याची घटना दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून सैनिकास अटक केली.शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी करिश्मा चव्हाण यांच्या तक्रारीनुसार बसस्थानकाजवळील पेट्रोल पंपाजवळ वाहतुकीचे नियंत्रण करीत असताना विरुद्ध दिशेने भरधाव दुचाकीवरून निशांत गोवर्धन सिरसाट (२७ रा. निंबी मालोकार) हा आला. त्यामुळे करिश्मा चव्हाण यांनी त्याची दुचाकी पकडली. त्यामुळे संतप्त झालेला सैन्यात असलेला निशांत सिरसाट याने महिला पोलीस कर्मचाºयासोबत वाद घातला. वाद वाढल्यामुळे निशांत सिरसाट याने महिला पोलीस कर्मचाºयावर हात उगारला. सिव्हिल लाइन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३२४ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आणि त्याची दुचाकी जप्त केली. निशांत हा सैन्यात असून, रांची येथे कार्यरत आहे. (प्रतिनिधी)