सायखेड (अकोला), दि. १0- रोहयोंतर्गत सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी एका जणाने महिला सरपंचाच्या घरी जाऊन अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १0 फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी बाश्रीटाकळी पोलिसांनी अकोला येथील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.राजनखेड येथील महिला सरपंच किरण प्रशांत घुगे यांच्या घरी अकोला येथील रहिवासी आरोपी देवीदास विठ्ठल गावंडे यांनी १0 फेब्रुवारी रोजी जाऊन त्याच्या शेतात सिंचन विहीर मंजूर करण्याची मागणी केली. यावेळी आता विहीर मंजूर करता येत नसल्याचे सांगितल्याने त्याने त्यांना ईल शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर विहीर मंजूर न केल्यास याकरिता तीन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार पंचायत समितीकडे करेन, असा दमसुद्धा दिला. हा प्रकार अरुण परसराम केंद्रे, भास्कर दीपक नागरे यांच्यासमोर घडल्याचे सरपंच किरण घुगे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत सरपंच घुगे यांच्याशी संपर्क साधला असता सन २0१२ मध्ये सिंचन विहिरीसाठी अर्ज स्वीकारले होते. परंतु पंचायत समितीच्या आदेशानुसार पुन्हा ग्रामसभा घेऊन २ ऑक्टोबर २0१५ मध्ये अर्ज घेण्यात आले. या ग्रामसभेनुसार देवीदास गावंडे यांनी अर्ज न करता व गावातील रहिवासी नसतानासुद्धा विहीर मंजुरीसाठी धमकी देऊन शिवीगाळ केली, असे सांगितले .दरम्यान किरण घुगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी देवीदास गावंडेविरुद्ध भादंवि २९४, ५0६ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
सिंचन विहीर मंजुरीसाठी महिला सरपंचास शिवीगाळ
By admin | Published: February 11, 2017 2:47 AM