अकोला : पातुर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीत उभारल्या जात असलेल्या दारुच्या दुकानास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दारुचे दुकान होऊ नये, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.पातुर शहरालगतच्या खानापूर हद्दीत जानेवारी महिन्यापासून दारु दुकानाचे काम सुरु आहे. या परिसरात दारुचे दुकान होऊ नये, यासाठी परिसरातील नागरिकांनी मार्च महिन्यात जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतरही दुकानाचे काम बंद न झाल्यामुळे अखेर या परिसरातील नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला. खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीतील दारु दुकानाचे काम त्वरीत थांबविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. याप्रसंगी प्रविण प्रल्हाद इंगळे यांच्यासह ढोणे नगर, सम्यम कॉलनी, समता नगर या परिसरातील नागरिक उपस्थित होते.
दारुबंदीसाठी सरसावल्या महिला
By admin | Published: April 03, 2017 2:06 PM