लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : येथे सुरू अवैध देशी दारू विक्री बंद करून दोषींवर कारवाईची मागणी महिलांनी थेट पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली. शिर्ला गावात खुलेआम अवैध देशी दारू विक्री केली जाते. त्यामुळे अनेकांच्या घरात भांडणे नित्याचीच बाब झाली आहे. विकोपाला गेलेली भांडणे संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरतात. महाविद्यालयीन विद्यार्थी ही मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे व्यसनी युवकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. मोतीराम कठाळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी बिट जमादारावर कारवाईची मागणी केली. शिर्लात अवैध देशी दारू विक्रीस पाठबळ देणाºया बिट जमादाराचा अहवाल सादर करण्यास पातूर ठाणेदारांना सांगितला आहे. पोलीस अधीक्षकांच्या बैठकीत संबंधितांवर कारवाईचे संकेत आहेत. निवेदनावर विमला भिकाजी ढाळे, सरूबाई बाळू खर्डे, सरस्वती नारायण हानोरे, मंगला लक्ष्मण ढाळे, लीला यलाप्पा ढाळे, येलुबाई गोविंद खर्डे, नर्मदा गिरिजा बळकार, पाखराबाई नारायण गवई, लक्ष्मीबाई इंगळे आदींसह अनेक महिलांची स्वाक्षरी आहे. यासंदर्भात शिर्ला ग्रामपंचायतने दारूबंदी ठराव घेतला आहे.
दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 2:55 AM
लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : येथे सुरू अवैध देशी दारू विक्री बंद करून दोषींवर कारवाईची मागणी महिलांनी थेट पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली. शिर्ला गावात खुलेआम अवैध देशी दारू विक्री केली जाते. त्यामुळे अनेकांच्या घरात भांडणे नित्याचीच बाब झाली आहे. विकोपाला गेलेली भांडणे संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरतात. महाविद्यालयीन विद्यार्थी ही ...
ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन