अकोला- पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या तुलंगा येथे अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे. ही दारू विक्री बंद करण्यात यावी, या मागणीसाठी तुलंगा येथील महिलांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली. तुलंगा येथे अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे ही दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेऊन दारू विक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. या बाबतचा ठराव चान्नी पोलिसांना देण्यात आला असून त्यांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे तुलंगा येथील नागरिकांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढून दारू विक्री बंद करण्याची मागणी. याबाबत त्यांनी पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले.या गावातील अनेक संसार या दारूमूळे मोडले असून, पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालून दारू विक्री बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या धडक मोर्चामध्ये सुमेध हातोले, सरपंच अर्जुन पाटील, प्रदीप रोकडे, धनराज गवई, राजेश जामनिक, मनोज रोकडे, गजानन ठाकरे, अमोल मामनकार, गुंफाबाई हातोले, गीता कंडारकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ** आत्मदहनाचा इशारातुलंगा येथील दारू विक्री बंद न केल्यास तीन महिलांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये गीता कंडारकर, अन्साबाई रोकडे, दुर्गा हातोले यांचा समावेश आहे. या तीनही महिलांनी आत्मदहनाचा इशारा दिला असून, पोलिस अधीक्षकांनाच दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे.
दारू बंदीसाठी महिलांचा धडक मोर्चा
By admin | Published: September 14, 2014 1:44 AM