अकोला :परिवर्तन घडविण्याची खरी ताकद युवकांमध्येच आहे. भाजपसोबत युती होईल किंवा नाही याची प्रतीक्षा न करता शिवसेनेला यश प्राप्त करून देण्यासाठी युवा सैनिकांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन युवा सेनेचे सचिव व नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी केले. विदर्भात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात येणार असून, त्यांची अकोल्यातही सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.युवा संवाद विदर्भ दौऱ्यानिमित्त शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपीकिसन बाजोरिया होते. प्रमुख अतिथी म्हणून युवासेना विस्तारक आमदार विप्लव बाजोरिया, सहायक संपर्र्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, युवा सेनेचे विस्तारक नित्यानंद त्रिपाठी, शिवसेना महिला आघाडीच्या ज्योत्स्ना चोरे, जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, महानगर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, डॉ. विनीत हिंगणकर, संतोष अनासने, तरुण बगेरे, प्रा.प्रकाश डवले, शुभांगी किनगे, रेखा राऊत, सुनीता श्रीवास, निलिमा तिजारे, राजेश्वरी अम्मा, वर्षा पिसोडे आदी होते.दौºयादरम्यान पूर्वेश सरनाईक यांनी शेतीच्या बांधावर जाऊन शेतपिकांची पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला. युतीचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुखांचा आहे. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी केले. संचालन जिल्हा प्रवक्ते सचिन ताठे यांनी तर आभार शहर प्रमुख नितीन मिश्रा यांनी मानले.कार्यक्रमाला युवासेना उप जिल्हा प्रमुख योगेश बुंदेले, राहुल कराळे, सोनू वाटमारे, दीपक बोचरे, जिल्हा समन्वयक निखिल सिंह ठाकुर ,कुणाल पिंजरकर, मुकेश निचळ, जिल्हा सचिव अभिजीत मुळे पाटील, राजेश पाटील, तालुका प्रमुख महेश मोरे, सागर चव्हाण, आस्तिक चव्हाण, विशाल पत्रिकार, अक्षय ताले, अजय लेलेकर, विकेश हिरनवाडे, शहर प्रमुख श्याम बहुरूपे, महादेव आवंदकर, नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चोपडे, कार्तिक गावंडे, उपशहर प्रमुख आशीष पवार, उपशहर प्रमुख मुन्ना ठाकुर, विभाग प्रमूख जुगेश विश्वकर्मा, रौनक जादवानी, विजय टिकार, प्रतिक देशमुख, आदित्य भांडे, अमेय घोगरे, प्रणव कथलकर,अजित घोगरे, कुणाल कुलट आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)