लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या अकोला शहरात सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे जवळपास पूर्ण झालेली असली तरी तिसºया टप्प्यातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे सुरू आहेत; परंतु गत काही महिन्यांत रस्त्यांची कामे संथ पडलेली आहेत. काही रस्त्यांची कामे महिनाभरापासून अर्धवट अवस्थेत ठप्प पडलेली आहेत. सिमेंट रस्त्यांमुळे एका बाजूची वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांना व नागरिकांना त्रास होतो. सोबतच अपघात होण्याची शक्यता असते. संथ सुरू असलेल्या कामांची गती वाढवावी तर ठप्प असलेली कामे पूर्ववत सुरू करून तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी अकोलेकर नागरिकांची मागणी आहे.राज्य सरकार, महापालिका यांच्या संयुक्त भागीदारीतून दुसºया टप्प्यातील सिमेंट रस्त्यांच्या प्रकल्पाची सुरुवात झाली. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाºया महापालिकेवर वाढीव आर्थिक भुर्दंड बसत असला तरी कामाचा दर्जा फारसा चांगला नाही. शहरातील अनेक मार्गांची कामे सुरू असल्याने ते मार्ग अघोषितपणे वन-वे झाले आहेत. वास्तविक पाहता येथे वाहतूक शाखेचे पोलीस असले पाहिजे; मात्र त्या ठिकाणी कुणीही नसतो. त्यामुळे अशा मार्गे प्रवास करणाऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
अकोला शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे संथगतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:37 PM