चान्नी फाटा-तुलंगा मार्गाने तुलंगा, चतारी, सांगोळा शहापूर, लावखेड आदी गावातील ये-जा करीत असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. या मार्गाने जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने या मार्गाने प्रवास करताना वाहनचालकास कसरत करावी लागते. याबाबत वारंवार तक्रारी देऊनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत होते. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाडेगाव येथील माजी ग्रा.पं. सदस्य सदानंद भुस्कुटे व वंचित युवक आघाडी तालुका महासचिव सुमेध हातोले यांनी मागणी केली होती. तसेच ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाला जाग आली असून, या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गाचे काम दर्जेदार करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे. (फोटो)
अखेर चान्नी फाटा-तुलंगा मार्गाचे काम सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:17 AM