शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शेतकऱ्यांनी बंद  पाडले नया अंदुरा प्रकल्पाचे काम; प्रकल्पस्थळीच उपोषणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 6:44 PM

नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले.

ठळक मुद्दे२२० शेतकऱ्यांची ८५० एकर जमीन संपादित केल्या जात असून, बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत.परिसरातील ४५०० एकर शेतजमिनीवर सिंचन होणार आहे; मात्र आतापर्यंत प्रकल्पाची किंमत ५० कोटींवरून २१२ कोटी रुपये झाली आहे. मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम बंद आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.

नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले. तसेच प्रकल्पस्थळीच शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रकल्पस्थळी शुकशुकाट होता.नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पासाठी २०११ ते २०१३ या कालावधीत संपादित जमिनीला दोन लाख रुपये एवढाच अल्पदराने मोबदला मिळाला. या प्रकल्पबाधित कास्तकारांना २०१७-२०१८ च्या नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे वाढीव ८ ते १० लाख रुपये मोबदला द्यावा, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २ एप्रिलपासून सुरू केलेले उपोषण जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या लेखी प्रस्तावामुळे ३ एप्रिल रोजी संध्याकाळी उपोषण स्थगित केले; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निर्णय पूर्ण न झाल्यामुळे अखेर नया अंदुरा प्रकल्पच्या ठिकाणी जाऊन १७ एप्रिल रोजी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाचे काम बंद पाडून प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणास बसले.नया अंदुरा प्रकल्पात कारंजा रम., अंत्री मलकापूर, उरळ बु., उरळ खु. या गावांतील २२० शेतकऱ्यांची ८५० एकर जमीन संपादित केल्या जात असून, बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत. परिसरातील ४५०० एकर शेतजमिनीवर सिंचन होणार आहे; मात्र आतापर्यंत प्रकल्पाची किंमत ५० कोटींवरून २१२ कोटी रुपये झाली आहे. प्रकल्पाची किंमत दरवर्षी वाढत असताना अल्पदराने जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना वाढीव दर का नाही, असा संतप्त सवालही कास्तकारांनी उपस्थित केला आहे. जमिनीचा वाढीव भाव मिळावा, शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकरी, पेन्शन योजना किंवा एकरकमी १० लाख रुपये द्यावे, बाळापूरचे उपविभागीय अधिकाºयांनी १.५ चा गुणांक लावून खरेदी केलेल्या त्या नवीन शासन परिपत्रकाप्रमाणे २ चा गुणांक लावून खरेदी कराव्यात, आधी पुनर्वसन मगच धरण, याप्रमाणे प्रकल्पबाधित घरांचे तत्काळ पुनर्वसन करून नवीन घरे बांधून देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम बंद आंदोलन व उपोषण सुरू केले आहे; मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणाचे ‘काम बंद’ आंदोलन व उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकºयांनी केला आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणBalapurबाळापूर