संतोष येलकर/ अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात काम करणार्या मजुरांना वेळेवर मजुरी प्रदान करण्याचे प्रमाण केवळ १८.१९ टक्के असून, ८१.८१ टक्के मजुरी उशिराने मजुरांना प्रदान केली जात आहे. रोहयो कामांवरील मजुरांना कामाचे दाम उशिरा मिळत असल्याने मजुरांना वेळेवर मजुरी वितरणाचा बोजवारा उडत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामाचे सात दिवसांत ह्यमस्टरह्ण तयार करून,२१ दिवसांत कामांवरील मजुरांना मजुरीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणे बंधनकारक आहे. रोहयो कामांवरील मजुरांना मजुरीची रक्कम वेळेवर प्रदान करण्याबाबत शासनामार्फत वारंवार दिल्या जातात; मात्र जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर व तेल्हारा या सातही तालुक्यांत रोहयो अंतर्गत काम करणार्या मजुरांना केवळ १८.१९ टक्के मजुरीचे प्रदान नियमानुसार वेळेवर करण्यात येते, तर ८१.८१ टक्के मजुरीचे प्रदान उशिराने करण्यात येते. रोहयो अंतर्गत काम केल्यानंतर मजुरांना कामाचे दाम (मजुरी ) उशिराने वितरित करण्यात येत असल्याने, मजुरीच्या रकमेसाठी मजुरांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे रोहयो अंतर्गत मजुरांना वेळेवर मजुरी प्रदान करण्याच्या नियमाचा बोजवारा उडत आहे.
रोहयो मजुरांना कामाचे दाम उशिरा
By admin | Published: December 29, 2015 2:24 AM