---------------
बेशिस्त पार्किंग, वाहतुकीचा खाेळंबा
बाळापूर: शहरातील मुख्य मार्ग असलेल्या हैदराबाद-इंदोर मार्गावर वाहनांची बेशिस्त पार्किंग हाेत आहे. त्यामुळे वाहतुकीस खोळंबा होत आहे. शहरात वाहतूक पोलीस असूनही कधीच वाहतूक पाॅइंटवर हजर नसल्याचे दिसून येते. होमगार्ड ड्युटी करीत असले तरी दर तासाने वाहतूक खोळंबा होत आहे.
---------------
गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण नाही
बाळापूर: तालुक्यात मुबलक प्रमाणात असलेल्या गौण खनिजाच्या चोरीवर महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विटांसाठी लागणाऱ्या माती, रेती, मुरूम यावर नियंत्रण नसल्याने मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊन शासनाच्या महसुलात मोठी घट होणार आहे.
---------------
प्रशासकीय कार्यालयाला नवीन जागेचा शोध
बाळापूर: तालुका प्रशासकीय इमारतीसाठी ३५ वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. इंग्रज काळापासून बाळापूर तालुका प्रशासनाचा कारभार जुन्या किल्ल्यातून सुरू आहे. किल्ल्यातून प्रशासकीय कार्यालये हलवावी म्हणून वारंवार पुरातत्व विभागाकडे पत्रव्यवहार करून न्यायालयातही दाद मागितली; परंतु कार्यालयाला जागाच मिळत नसल्याने प्रशासकीय सुविधा नसतानासुध्दा वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे.
---------------