मूर्तिजापूर : अमरावती महानगर पालिकेचे आयुक्त प्रविण श्रीराम आष्टीकर कर्तव्यावर असतांना काही महीलांनी आयुक्तांच्या आगावर शाई भेकून त्यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. याच्या निषेधार्थ मूर्तिजापूर नगर परिषद मध्ये १० फेब्रुवारी रोजी प्रशासक तथा मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना व नगर परिषद संवर्ग कर्मचारी संघटना शाखा मूर्तिजापूरच्या वतीने या गुन्हेगारीकृत्यांचा जाहीर निषेध करत १० फेब्रुवारी रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विजय लोहकरे प्रशासक तथा मुख्याधिकारी, न.प. मुर्तिजापूर , कर्मचारी संघटना शाखा मूर्तिजापूर चे अध्यक्ष शिरीष गांधी, उपाध्यक्ष शालीग्राम यादव, प्रविण शर्मा, विजय लकडे व इतर संघटनेचे पदाधिकारी तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर क्रॉगेस शाखा मूर्तिजापूर चे अध्यक्ष रवि सारवान, रंजीत सौदे, राजेश बोयतकर, अजय मिलांदे, गौतम पिवाल, जितेंद्र चावरे व संघटनेचे पदाधिकारी तसेच उपमुख्याधिकारी अमोल बेलोटे, कार्यालय अधिक्षक निशिकांत परळीकर, सहा.नगर रचनाकार प्रांजल कंसारा, नरेंद्र फुरसुले, नितू कोकणकर, शितल शिरभाते, चित्रा हनुमंते, माधुरी पाठक, अनिता सिरसाट, बसंती यादव, सचिन पाटील, अनिकेत मांगरुळकर, स्वप्नील बिलारी, पुरुषोत्तम पोटे, विजय कोरडे, रवि तिवारी, नितीन शिंगणे, संतोष शहाकर, विनोद तेलगोटे, सुरज ठाकुर, रामू मेश्राम वइतर कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मुर्तिजापूर नगर परिषदेत कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 12:52 PM