अकोला : गुजरातमधून मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात गावाकडे पायी निघालेल्या ११ मजुरांना शुक्रवारी दुपारी अकोल्यात थांबविण्यात आले. शिवणी येथील समाज मंदिरात या मजुरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात लागू असलेल्या ‘लॉकडाउन’मध्ये विविध राज्यांत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची गावाकडे जाण्याची ओढ सुरू झाली आहे. त्यामध्ये गुजरातमधून मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आपल्या गावाकडे पायी निघालेले ११ मजूर १५ मे रोजी दुपारी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मध्य प्रदेशातील आपल्या गावाकडे पायी निघालेल्या या मजुरांना अकोल्यात थांबविण्यात आले असून, शिवणी येथील समाज मंदिरात त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
गुजरातमधून मध्य प्रदेशातील आपल्या गावाकडे पायी निघालेल्या ११ मजुरांना अकोल्यात थांबविण्यात आले आहे. शिवणी येथील समाज मंदिरात त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य प्रदेश शासनाकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित मजुरांना बसद्वारे त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात येणार आहे.-विजय लोखंडे,तहसीलदार, अकोला.