लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी प्रदान करण्याकरिता माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ‘डीबीटी पोर्टल’नुसार राज्यात कार्यान्वित होणार आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कमवि, वमवि व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील प्राचार्य व शिष्यवृत्ती संबंधित काम पाहणारे लिपिक कर्मचारी महा डीबीटी पोर्टलसंदर्भात दोन दिवसीय तालुकानिहाय कार्यशाळेचे श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण महा डीबीटी अंतर्गत तांत्रिक सल्लागार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. तालुकानिहाय कार्यशाळा ३१ जुलै २०१७ सकाळी ११.०० वाजता अकोला, अकोट, तसेच १ आॅगस्ट २०१७ सकाळी ११.०० वाजता मूर्तिजापूर, तेल्हारा, बाळापूर, पातूर व बार्शीटाकळी.करिता सर्व प्राचार्यांना महा डीबीटी पोर्टलसंदर्भात होणाºया कार्यशाळेसाठी श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे उपस्थित राहण्याचे आवाहन समाजकल्याण अकोलाचे सहायक आयुक्त ए.एम. यावलीकर यांनी केले आहे.
‘डीबीटी पोर्टल’बाबत आजपासून कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 7:58 PM
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी प्रदान करण्याकरिता माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ‘डीबीटी पोर्टल’नुसार राज्यात कार्यान्वित होणार आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कमवि, वमवि व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील प्राचार्य व शिष्यवृत्ती संबंधित काम पाहणारे ...
ठळक मुद्दे३१ जुलै रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात होणार कार्यशाळा