अकोला, दि. १२- बुद्धीबळाच्या सारिपाटावर भल्याभल्यांना मात देणारी अकोल्याची चिमुकली बुद्धिबळपटू संस्कृती संघदास वानखडे ही आता जॉजिर्या येथे १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणार असलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आपली चुणूक दाखविणार आहे. यासाठी सध्या ती पुणे येथे भारताचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.संस्कृतीने अडीच वर्षांंंची असताना पहिल्यांदा बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला. या खेळाप्रती तिचे आकर्षण पाहून तिचे वडील संघदास वानखडे यांनी तिला बुद्धिबळाचे प्राथमिक धडे दिले. त्यानंतर तिला या खेळाचे योग्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्रात पाठविले. अल्पावधीतच संस्कृतीने बुद्धिबळात प्रावीण्य मिळविले. सध्या दहा वर्षांंंंची असलेल्या संस्कृतीने आतापर्यंंंत श्रीलंका, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया, थायलंड, सिंगापूर व मंगोलिया येथे शालेय बुद्धिबळ स्पर्धा गाजवून सुवर्ण पदक पटकावले. विदेश दौर्यासाठी तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे सहकार्य लाभले आहे. संस्कृती सध्या पुणे येथे ग्रँड मास्टर अभिजित कुंटे व मृणालिनी कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
अकोल्याची संस्कृती वानखडे खेळणार जागतिक बुद्धिबळ स्पर्धा
By admin | Published: October 13, 2016 2:48 AM