शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

Akola: आज जागतिक वन दिवस: अकोला जिल्ह्यात केवळ ७ टक्के भूभाग वनाच्छादित, ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र

By रवी दामोदर | Published: March 20, 2023 6:13 PM

World Forest Day: मुळातच जंगलक्षेत्र कमी असलेल्या पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्याचा केवळ सात टक्के भूभाग वनाच्छादित आहे. ५४३१.०० चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्र असलेल्या अकोला जिल्ह्यात केवळ ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र आहे.

- रवी दामोदरअकोला -  मुळातच जंगलक्षेत्र कमी असलेल्या पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्याचा केवळ सात टक्के भूभाग वनाच्छादित आहे. ५४३१.०० चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्र असलेल्या अकोला जिल्ह्यात केवळ ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र आहे. जंगलाचे कमी प्रमाण हेच अकोला जिल्ह्याचे तापमान अधिक असण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी, यासाठी ‘२१ मार्च’ हा दिवस ‘जागतिक वन दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९७१ मध्ये युरोपियन कॉन्फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चरच्या २३व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना (थीम) ही ‘वने आणि आरोग्य’ आहे.

राष्ट्रीय वननीतीनुसार ३३ टक्के भूभाग हा वनाच्छादित असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यात १६ टक्के भूभागावर जंगल आहे. अकोला जिल्ह्यात हे प्रमाण आणखी कमी होते. जिल्ह्यातील तीन वने ही उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने या प्रकारात मोडतात. प्रामुख्याने अकोट, पातूर व बार्शिटाकळी तालुक्यांत घनदाट जंगलाचे पट्टे आढळून येतात. इतर तालुक्यांमध्ये मात्र फारसे वनक्षेत्र नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलक्षेत्र वाढणे गरजेचे असल्याने शासनाकडून वनसंवर्धनासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचे चांगले परिणाम दिसत नसल्याचे वास्तव आहे. काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यकाटेपूर्णा अभयारण्य ७३.६३ चौरस किमी असून, येथे वनस्पतींच्या ११५ प्रजाती आढळतात. मुख्य वृक्ष प्रजातींमध्ये बेहडा, धावडा, मोह, तेंदूपान, खैर, सळई, ओला आढळतात. अभयारण्य चौशिंगी काळवीट आणि बार्किंग हरणासाठी प्रसिद्ध आहे. नरनाळा वन्यजीव अभयारण्य२ मे, १९९७ रोजी नरनाळा किल्ला व त्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. हे अभयारण्य अकोट तालुक्यात असून, १२.३५ चौ.किमी क्षेत्रावर पसरले आहे. या अभयारण्यात सांबर, बिबट्या, तसेच बार्किंग डिअर हे प्राणी प्रामुख्याने आढळतात.

टॅग्स :Akolaअकोलाforestजंगल