क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान संघ, अजिंक्य फिटनेस क्लब, विविध शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सूर्यनमस्कार दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमासाठी १२ ते ३० जानेवारी २०२१ या कालावधीत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून उत्कृष्ट सूर्यनमस्कार करणाऱ्या तीन मुले व तीन मुली यांचा प्रात्यक्षिक व्हिडिओ सूर्यनमस्कार परीक्षकांना व्हॉट्सॲपद्वारा पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी केले आहे. प्रात्यक्षिक व्हिडिओमध्ये विद्यार्थी हे शालेय गणवेश किंवा विशिष्ट व्यायाम पोशाख परिधान केलेले असणे आवश्यक आहे. यासाठी परीक्षक म्हणून सारिका तिवारी, रश्मी जोशी, धनंजय भगत व प्रशांत पाटील हे काम पाहणार आहेत.