अकाेला : सिटी काेतवाली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता भाजी बाजार येथे असलेल्या एका बियाणे विक्रीच्या दुकानातून सुमारे तीन लाख रुपयांचे कांदा बियाणे चाेरीला गेल्याची घटना साेमवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनता भाजी बाजारातील एका बियाणे विक्रीच्या दुकानात सुमारे ६ लाख रुपयांचे कांदा बियाणे ठेवण्यात आले हाेते. यामधील चार बाॅक्स म्हणजेच सुमारे तीन लाख रुपयांचे बियाणे चाेरट्यांनी पळविल्याची घटना साेमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणाची तक्रार सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात करण्यात आली असून, पाेलिसांनी चाेरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पाेलीस उप-अधीक्षक सचिन कदम, सिटी काेतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी पथकासह धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून तपास सुरू केला आहे; मात्र सीसी टीव्ही फुटेज नसल्याने तसेच इतर ठिकाणचे फुटेज पाेलिसांनी तपासणे सुरू केले असून, यावरून या चाेरीमागे संभ्रम निमाण हाेत असल्याचे दिसून येत आहे. कांदा बियाण्यांचे चाेरटे करणार तरी काय, असा सवाल पाेलिसांकडून उपस्थित हाेत असून, या चाेरीचा लवकरच उलगडा हाेणार असल्याची माहिती आहे.