लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरातील मल्लांकडून प्रतीक्षा केल्या जाणाºया वाशिममधील कुस्त्यांच्या दंगलीची ५० वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून ४ नोव्हेंबरपासून सुरूवात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील मल्लांनी सहभाग नोंदविला आहे. सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा समारोप करण्यात आला.श्री बालासाहेब यात्रा महोत्सवा तथा स्व. गोविंदराव भालेराव यांच्या प्रेरणेतून ५० वर्षांपासून वाशिममध्ये कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते. दरम्यान, स्पर्धेचे यंदाचे वर्ष ५१ वे असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भरघोस बक्षीसांची तरतूद करण्यात आली होती. ४ नाव्हेंबरला पार पडलेल्या स्पर्धेतील विजेत्या मल्लांना प्रथम बक्षीस ७ हजार, व्दितीय ६ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार, पाचवे २ हजार आणि सहावे १ हजाराचे बक्षीस देण्यात आले; तर ५ नोव्हेंबरला झालेल्या स्पर्धेतील विजेत्या मल्लांना प्रथम बक्षीस ५१ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार, चतुर्थ ११ हजार, पाचवे ७ हजार रुपये देण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रच नव्हे; तर अन्य राज्यातील मल्लांनीही हजेरी लावली.
वाशिममधील कुस्त्यांच्या दंगलीत राज्यभरातील मल्लांचा सहभाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 5:30 PM