अकाेला : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठीच्या प्रकियेला ११ जूनपासून प्रारंभ हाेत आहे. काेराेना संकटामुळे गेल्यावर्षी प्रवेश झालेल्या गरीब विद्यार्थ्यांना शाळेत न जाताच अभ्यासविनाच हे शैक्षणिक सत्र पार पाडावे लागले.
जिल्ह्यात आरटीईअंतर्गत १ हजार ९६० जागा असून, ४ हजार ७०७ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले हाेते. त्यातून पहिल्या टप्प्यात १ हजार ८१७ विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड झाली आहे
खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांमुळे गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिकता येणे शक्य झाले आहे.
बाॅक्स....
आरटीईमुळे गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या चांगल्या शाळेत शिकण्याची संधी मिळाली, मात्र गेल्या वर्षभरात काेराेनामुळे या शाळा ऑनलाइनच हाेत्या. अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक साधनाची कमतरता आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाने साधने पुरविण्याची गरज आहे. त्या करिता सरकारने अशा विद्यार्थ्यांची शाळांकडून माहिती घेऊन साधने पुरवावे, अशी मागणी श्याम कुलट यांनी केली आहे. साेडतीमध्ये संधी मिळालेल्या पाल्यांचे मूळ कागदपत्रे, छायांकित प्रती व अन्य दस्तावेज याची पडताळणी शाळेत हाेणार आहे. यावेळी पालकांना सहकार्याची भूमिका संस्थांनी घ्यावी, अशी अपेक्षाही कुलट यांनी व्यक्त केली आहे
पालक म्हणतात...
आरटीईमधून मुलाला काॅन्व्हेंटमध्ये प्रवेश मिळाला मात्र शाळेत जाण्याचा याेग काेराेनामुळे आलाच नाही. त्यामुळे मुलाचा हिरमाेड झाला.
संदीप वानखडे
अकाेला शहरातील चांगल्या शाळेत लाॅटरी पद्धतीने मुलीची निवड झाली, मात्र शाळेने इतर शुल्काच्या नावाखाली फी पाठविली हाेती काेराेनामुळे फी भरण्याचे काम पडले नाही, मात्र याबाबत शिक्षण विभागाने दखल घेण्याची गरज आहे.
सतीश उमक
शिक्षणाधिकारी म्हणतात
आरटीईअंतर्गत प्रवेशाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनायाने प्रक्रिया राबविण्याबाबतचा आदेश दिला आहे त्यानुसार ११ जूनपासून प्रक्रिया हाेत आहे निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० दिवसांचा कालावधी देण्यात यावा असे आदेश असून, शाळेतच कागदपत्रांची पडताळणी हाेणार आहे.
डाॅ. वैशाली ठग
शिक्षणाधिकारी प्राथमिक
अशी आहे जिल्ह्याची स्थिती
नोंदणी केलेल्या शाळा - २०२
एकूण जागा - १ हजार ९६०
आलेले अर्ज - ४७०७