शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

तरुणांनी ग्रामगीता आत्मसात करावी! - आमदार रणधीर सावरकर यांचे प्रतिपादन 

By atul.jaiswal | Published: February 10, 2018 7:44 PM

अकोला: ग्रामगीता हा सर्व ग्रंथांचे सार असून, त्यात सर्व प्रश्नांची उकल आहे. तरुणांनी ग्रामगीता केवळ वाचून चालणार नाही, तर आत्मसात करून जीवन जगताना ती आचरणात आणली पाहिजे, तरच ती राष्ट्रसंतांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

ठळक मुद्देवंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवास मोठी उमरी येथे शनिवार, १० फेब्रुवारी थाटात प्रारंभ झाला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती मोठी उमरी, अकोला यांच्याद्वारे आयोजित महोत्सव.दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. ममता इंगोले यांच्या अध्यक्षतेत महिला संमेलन पार पडले.

अकोला: ग्रामगीता हा सर्व ग्रंथांचे सार असून, त्यात सर्व प्रश्नांची उकल आहे. तरुणांनी ग्रामगीता केवळ वाचून चालणार नाही, तर आत्मसात करून जीवन जगताना ती आचरणात आणली पाहिजे, तरच ती राष्ट्रसंतांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती मोठी उमरी, अकोला यांच्याद्वारे आयोजित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवास मोठी उमरी येथे शनिवार, १० फेब्रुवारी थाटात प्रारंभ झाला. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार रणधीर सावकर बोलत होते.यावेळी विचारपीठावर अध्यक्ष म्हणून माजी सरपंच सदस्य बळीराम कपले, महापौर विजय अग्रवाल, माजी जि. प. अध्यक्ष बालमुकुंद भिरड, मुंगुटराव बेले, प्रा. डॉ. संतोष हुशे, सारंग खोडके, विजय मुंडगावकर, अरुण परोडकर, के. व्ही. मसने, दिनकर ओळंबे, जयंत मसने, गंगाधर पाटील, देवीदास आजनकर, मिलिंद राऊत, संतोष शेगोकार, हरीश काळे, अनिल नावकार, संदीप गावंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे संचालन रवींद्र अस्वले यांनी, तर आभार प्रदर्शन शशिकांत बांगर यांनी केले.तत्पूर्वी, सकाळी ६ वाजता सामुदायिक ध्यान चिंतन पार पडले. यावेळी गोवर्धन खवले, रमेश मानकर, गजानन कडू, डिगांबर घोगरे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर पतंजली योगसाधना पार पडली. सकाळी ८ वाजता गुरुदेव सेवा भजन मंडळ, खदान यांनी खंजिरी भजन सादर केले. सकाळी १० वाजता भगवान गावंडे यांनी राष्ट्रीय प्रबोधन सादर केले.दुपारच्या सत्रात महिला संमेलनदुपारच्या सत्रात प्रा. डॉ. ममता इंगोले यांच्या अध्यक्षतेत महिला संमेलन पार पडले. प्रमुख वक्त्या म्हणून किमया आमले, पूर्वा चतारे, साक्षी पवार, ताराबाई अस्वारे, कोमल हरणे, तर प्रमुख अतिथी म्हणून अनुराधा नावकार, पल्लवी गावंडे, सविता रवाळे, मंदा मोकळकर, योगीता बढे, प्रतिभा शेंडे, स्वाती वानखडे यांची उपस्थिती होती. संचालन वैशाली लोथे, आभार प्रदर्शन प्रगती इंगळे यांनी केले. सायंकाळच्या सत्रात प्रभुदास महाराज वानखडे यांनी राष्ट्रीय कीर्तन सादर केले. त्यानंतर सायंकाळी पंकजपाल महाराज यांनी विनोदी पद्धतीने सादर केलेल्या राष्ट्रीय कीर्तनाने उमरीवासी मंत्रमुग्ध झाले.यांचे लाभले सहकार्यमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र झामरे, देवीदास आजनकर, रामेश्वर बरगट, अ‍ॅड. संतोष भोरे, वसंत वाघमारे, संजय इंगळे, शशिकांत बांगर, राज मसके, बाळासाहेब लाळे, सतीश ठाकरे, मनोज मेश्राम, विठ्ठल लोथे, संगीता जयस्वाल, स्वाती वानखडे, प्रमोद शेंडे, नवीन देशमुख, जय इंगळे, प्रणव लोथे, विशाल शेंडे, अमर लाळे, साक्षी इंदोरे, श्रीकृष्ण वानखडे, मोहन इंगळे, रवींद्र अस्वारे, वैष्णवी लोथे, प्रगती इंगळे, श्रेया शेंडे, सोनाली मसके, दिव्या इंगळे, शरद शेंडे, विनायक शेंडे, राजू बोर्डे, माधव पुुंडकर, देवीदास नेमाडे, राजेश बाभूळकर आदींचे सहकार्य लाभले.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजRandhir Savarkarरणधीर सावरकर