- अतुल जयस्वालअकोला: बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम नंबर किंवा ओटीपी विचारून खात्यातील पैशांवर डल्ला मारणाऱ्या सायबर चोरटे किंवा हॅकर्सनी आता चक्क ट्विटर अकाउंट हॅक करून त्याचा दुरुपयोग करण्याची शक्कल लढविली आहे. ‘तुमचं ट्विटर अकाउंट बंद होणार आहे, तुमच्या नंबरवर पाठविलेल्या ‘एसएमएस’मधील व्हेरिफिकेशन कोड सांगा’ अशी विचारणा करणारे फोन ‘नेटीझन्स’ना अज्ञात नंबरवरून येत आहेत. असा फोन आल्यास सावधगिरी बाळगून कोणताही ओटीपी किंवा कोड सांगू नये, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.आॅनलाइन व डिजिटलायझेनच्या या काळात सायबर हॅकर्स, चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, विविध क्लृप्त्या योजून हे चोरटे बँक खात्यांमधून लाखो रुपयांना गंडा घालत असल्याचे प्रकार घडत आहेत. सायबर चोरट्यांनी आता त्यांचा मोर्चा आता चक्क टिष्ट्वटर अकाउंट हॅक करण्याकडे वळविला आहे. गत काही दिवसांपासून शहरात अनेकांना ‘टिष्ट्वटर’मधून बोलत असल्याचे फोन येत आहेत. ‘तुमचे टिष्ट्वटर अकाउंट बंद होणार आहे, सुरू ठेवायचे असेल, तर तुमच्या मोबाइलवर पाठविलेला कोड सांगा’, अशी विचारणा केली जात आहे. हे फोन उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधून येत आहेत. ट्विटर कडून अशाप्रकारचे कोणतेही फोन केले जात नसल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. फोन करणाºयाला व्हेरिफिकेशन कोड सांगितल्यास तुमचे अकाउंट हॅक होऊन त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो, असे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.फोन क्रमांक परराज्यातीलसायबर चोरटे हे प्रामुख्याने परराज्यातील आहेत. हे फोन क्रमांक पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड आदी राज्यांमधील असल्याने त्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे.कोड सांगण्याचा आग्रहट्विटरमधून बोलत असल्याचे सांगणारी व्यक्ती फोनवर पाठविलेला व्हेरिफिकेशन कोड सांगण्याचा आग्रह करते. तसेच एसएमस आलेल्या क्रमांकावर रिप्लाय करू नका, यावरही फोन करणाºयाचा भर असतो. कोड सांगितला नाही, तर तुमचे अकाउंट बंद करू, अशी धमकीही फोन करणारी व्यक्ती देत असल्याचा नेटीझन्सचा अनुभव आहे.असा होऊ शकतो दुरुपयोगतुमचे ट्विटर अकाउंट हॅक केल्यानंतर त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. तुमच्या नावे अश्लील संदेश पाठविणे, खंडणी मागणे, धमकावणे असे प्रकार होऊ शकतात.