अकाेला : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गत दाेन वर्षांपासून ऑनलाइन दंड ठाेठावण्यात येत आहे, मात्र हा दंड फुरसतीने भरण्याची सुविधा शासनाने करून दिल्याने अनेक जण दंडाची रक्कम तातडीने भरत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच अकाेला जिल्ह्यातील तब्बल एक लाख १२ हजार वाहनचालकांकडे सुमारे तीन काेटी रुपयांचा दंड थकीत आहे. हा दंड न भरणाऱ्यांवर फाैजदारी कारवाई हाेण्याची शक्यता आहे. तशी तरतूदही प्रशासनाने करून ठेवली आहे. दंड थकीत असलेल्यांना नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत, तसेच अकाेला वाहतूक शाखेने हा दंड भरण्यासाठी लाेक अदालतमध्येही प्रयाेजन केले हाेते. गत तीन दिवसांपासून दंडाची रक्कम पाेलीस स्टेशन, वाहतूक शाखेचे पाेलीस अंमलदार तसेच वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात येत आहे. ही रक्कम ऑनलाइन जमा हाेताच पावतीही देण्यात येत आहे.
३००००००० येणे बाकी
तीन काेटींचा दंड थकीत
राॅंग साइड २४ लाख ४५ हजार
हेल्मेट नाही १८ लाख ९० हजार
नाे पार्किंग ४२ लाख ५५ हजार
सिग्नल ताेडणे ०९ लाख ८० हजार
इतर सर्व २ काेटी १० लाख
वाहनावर दंड आहे का, या ॲपवर शाेधा..
तुमच्या वाहनावर दंड असेल तर तुम्ही शासनाने दिलेल्या महाट्रॅफिक ॲपवर जाऊन पाहु शकता़ यासाेबतच वाहतूक शाखेचे पाेलीस अंमलदार यांच्याकडे असलेल्या विशेष यंत्राव्दारेही तुमच्या वाहनावर दंड असेल तर आपण पाहू शकता.
अकाेला जिल्ह्यातील तब्बल एक लाख १२ हजार वाहनचालकांकडे सुमारे ३ काेटी रुपयांचा दंड थकीत आहे. हा दंड भरण्यासाठी विशेष माेहीमच गत आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे ज्यांच्या वाहनावर दंड थकीत आहे त्यांनी ताे दंड तातडीने वाहतूक शाखेचे पाेलीस अंमलदार तसेच वाहतूक शाखा कार्यालयात ऑनलाइन जमा करावा तसेच त्याची रीतसर पावतीही मिळणार आहे. दंड न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
- विलास पाटील
प्रमुख, वाहतूक शाखा,
अकाेला