घोडेगाव येथील गणेश लक्ष्मण कवळे (३५) याने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सुभाष गणपत कवळे (रा. घोडेगाव) यांच्या तक्रारीनुसार घटनेच्या दिवशी तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जगदीश पुंडकर याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू
तेल्हारा : तालुक्यातील थार शेतशिवारात मौजे गाडेगाव- तुदगाव रस्त्यावरील महावितरणच्या विजेच्या तारांचा जबर धक्का बसल्याने बैलगाडीला जुंपलेल्या एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
तेल्हारा येथील रहिवासी शेख अफजल शेख दाऊद यांच्या मालकीची बैलगाडी थार शेतशिवारातून जात असताना रस्त्यावरील पडलेल्या जिवंत विद्युततारेचा बैलाला स्पर्श झाला. त्यातच बैलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेख अफजल यांनी तेल्हारा पोलिसांकडे तक्रार दिली आहे.