अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची होत असलेली गैरसोय, औषधांचा तुटवडा, डॉक्टर उपलब्ध नसणे, स्वच्छतेचा अभाव आदी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी अधिष्ठातांच्या कक्षासमोर ‘झोपा काढा’ आंदोलन करण्यात आले. एन.एस.यु.आय चे प्रदेश महासचिव आकाश कवडे यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल सारवान व युवक काँग्रेसचे विधानसभा अमोल काळण यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या वाशिम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. गरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय मोठा आधार ठरले आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. एवढेच नव्हे, तर डॉक्टरांची अनुपस्थिती, स्वच्छतेचा अभाव, एमआरआय मशिन नसणे यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. या समस्यांबाबत निवेदने देऊनही कोणताही फरक पडलेला नाही. या ज्वलंत समस्यांकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेस व एनएसयूआयच्यावतीने वैद्यकीय महाविद्यालयात मुख्य प्रशासकीय इमारतीत ‘झोपा काढा’ आंदोलन करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना सोपविले. यावेळी एन.एस.यु.आय चे जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील, महानगर अध्यक्ष सारंग शिंदे, अनु.जाती-जमाती तालुका अध्यक्ष विजय जामणीक, सोनु गवई, एन.एस.यु.आय चे महासचिव अक्षय गडेकर, सम्राट ठाकरे, ऋषीकेश जामोदे, सोनु सारवान, वैभव सुळकर,कुणाल झामरे, अभिजित तवर,अश्विन खडसे, रवि खैरे, मुकुंद सरनाईक, जय गिºहे, आकाश गोवर,संतोष झांझोटे, सुरज भारोडे, शंतनु बोरकर,सुमित पांडे, सोहेल खान, अंगद काकडे आदी उपस्थित होते. याव्