लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद हल्ल्यात सहा भाविकांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी झालेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सायंकाळी शहरात कॅँ डल मार्च काढण्यात आला. अमरनाथ यात्रेदरम्यान दर्शन करून परतणाऱ्या भाविक भक्तांच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. अंदाधुंद गोळीबारात सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर गोळीबारामुळे अनेक भाविक जखमी झाले. अमरनाथला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर हल्ला चढविणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करावा, अशा भावना सर्व स्तरातून उमटत आहेत. युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सायंकाळी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाराणा प्रताप बाग ते राजराजेश्वर मंदिरापर्यंत कॅँ डल मार्च काढण्यात आला. यावेळी काँगे्रसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर मदन भरगड, युवक काँग्रेसचे पदाधिकारी महेश गणगणे, माजी नगरसेविका तथा महिला काँग्रेस कमिटीच्या महानगराध्यक्ष सुषमा निचळ, राजेश मते पाटील, नगरसेवक पराग कांबळे, मनीष हिवराळे, राजेश पाटील, कपिल रावदेव, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, गणेश कटारे आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची सुरक्षा व्यवस्था करण्यात मोदी सरकार कुचकामी ठरल्याचा निषेध यावेळी नोंदविण्यात आला. रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे श्रद्धांजलीहिंदी भाषिकांच्या पहिल्याच श्रावण सोमवारी अमरनाथ यात्रेकरूंवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सहा जण मृत्युमुखी पडले असून, बसमधील हल्ल्यात अनेकांना जखमी करून दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांचा तातडीने खात्मा करावा, अशी संतप्त भावना आ. शर्मा यांनी व्यक्त करीत मृतकांना ताातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्यांना आ. गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कैलाश मामा अग्रवाल, डॉ. संजय सोनवणे, अशोक गुप्ता, ब्रिजमोहन चितलांगे, गिरीश जोशी, गिरीराज तिवारी, संदीप वाणी, अनिल थानवी, बाळकृष्ण बिडवाई, अनिल गावीत, नितीन जोशी, राम ठाकूर, रोहित खोवाल, शंकर खोवाल, सागर भारुका, भावना भिरड, पुष्प वानखेडे, संजय जिरापुरे, रेखा नालट, वंदना राऊत, वसुधा बिडवाई, सोनाल ठाकूर, सुनीता अग्रवाल, सागर शेगोकार, अजय शर्मा आदी उपस्थित होते.
युवक काँग्रेसच्यावतीने कॅँ डल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2017 1:20 AM