युवक काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:24 PM2020-09-21T17:24:13+5:302020-09-21T17:26:35+5:30

पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला.

Youth Congress protests against the central government | युवक काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध

युवक काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध

Next

अकोला : संसदेत पारित झालेले कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. संसदेत चर्चा न करता हुकूमशाही पद्धतीने अध्यादेश काढून शेतकरीविरोधी विधेयक पारित केल्याबद्दल अकोला जिल्हा युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला. या निषेध आंदोलनामध्ये अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष महेश गणगणे यांच्यासह  शहर युवक काँग्रेस अध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Youth Congress protests against the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.