अकाेला: कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकाेल्यातील युवक काॅँग्रेसने बुधवारी लाक्षणिक उपाेषण केले.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकाविराेधात दिल्लीत आंदाेलन पेटले आहे. या विधयकांमुळे देशातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात येण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती व्यक्त करून हे तीनही कृषी कायदे तातडीने रद्द करावेत आणि किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी द्यावी, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आंदाेलन सुरू आहे. या आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी युवक काँग्रेसने अंशुमन देशमुख, ॲड. महेश गणगणे, सागर कावरे, राहलु थाेटांगे, कपिल रावदेव, नीलेश चतरकर, राजेश पाटील, कपिल ढाेके, अक्षय इनामदार, रणजित कवटकार, अंकुश भेंडेकर आदींनी लाक्षणिक उपाेषण केले. या आंदाेलनाला डाॅ. सुधीर ढाेणे, प्रकाश तायडे, राजेश पाटील आंदीनी भेट देऊन पाठिंबा दिला.