युवक काँग्रेसच्या निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 06:53 PM2018-10-14T18:53:29+5:302018-10-14T18:54:12+5:30
अकोला - युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 2 ते 15 आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
अकोला - युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 2 ते 15 आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर कावरे यांच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यामध्ये युवक काँग्रेस अकोला महानगर च्या वतीने 13 आॅक्टोंबर रोजी निबंध स्पधेर्चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेमध्ये शहरातील शिवाजी माध्यमिक शाळा, जागृती विद्यालय, न्यु इंग्लिश, शिवाजी टाउन शाळा, ज्योती विद्यालय, बाल शिवाजी शाळा, सावित्रीबाई फुले या शाळेसह जिल्ह्यातील शाळांच्या साडेतीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर निबंध स्पर्धेस प्रारंभ झाला. महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या स्पधेर्चे आयोजन केल्याची माहिती सागर कावरे यांनी दिली. स्पर्धेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध गटांमध्ये पारितोषिक देण्यात आले. यासोबतच सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन प्रदेश सचिव सागर कावरे पाटील, अंशुमन देशमुख यांनी केले होते. यावेळी गोपाल सांगूनवेढे, विलास तायडे, फैसल खान, अभिलाष तायडे, शेख कलीम, भूषण चतरकर, अभय टाले, मोहम्मद शारीक, निखिल पडघन, मुन्ना नहाटे, फरहान इर्शाद खान यांनी निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.